जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी नेहमीच चोरीच्या घटना घडत असतात तर जळगाव शहरापासून नजीक असलेले झुरखेडा येथील बागेश्वर धाम यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले असूण या ठिकाणी लाखो भाविक कथेस्थळी दाखल झाले आहे याठिकाणी जिल्हा पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावला असल्यावर देखील या ठिकाणी चोरी करणाऱ्या संशयित महिलांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या झुरखेडा येथे बागेश्वर धाम सरकार धीरेद्न शास्त्री यांची कथा होत आहे. याठिकाणी राज्यातील अनेक भागातून लाखो भाविक दाखल झाले असून आज दि. २६ रोजी याठिकाणी काही महिल्याच्या गळ्यातील पोत व सोन्याच्या दागिने या ठिकाणी चोरीला गेल्याची घटना आज घडली. काही वेळात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयित महिलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित महिलांची कसून चौकशी सुरु होती.