जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे मंगळवारी रात्री तीन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. तासाभरात दोन दुचाकी सापडल्या असून घटना माळी समाज मंगल कार्यालयाच्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळी समाज मंगलकार्यालयात विवाह गर्दी होती. याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. या दरम्यान पत्रकार मनोज जोशी यांची एमएच १९, एजे ०३४१ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. त्यानंतर ज्ञानेश्वर कुमावर यांची एमएच १७, ५६६८ क्रमांकाची तर समाधान भोंबे यांची विना क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. यातील कुमावत आणि भोंबे यांची दुचाकी नदी पात्रात आढळून आली. मात्र जोशी यांची दुचाकी मिळाली नाही. घटनास्थळी पोलिस कर्मचारी अमोल पाटील, गोपाळ माळी व राहुल पाटील यांनी धाव घेऊन मदत कार्य केले. तर सोबत शिक्षक रत्नाकर पाटील व रवींद्र लाठे यांनी रात्री बारापर्यंत शोध मोहीमसाठी मदत कार्य केले.
मनोज जोशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयितांकडून टेहळणी सुरू होती. याची माहिती रात्री एक वाजता मिळताच पोलिस कर्मचारी गोपाळ गायकवाड, जीवन बंजारा व हेमंत सोनवणे यांनी पाहणी केली.