पारोळा : प्रतिनिधी
पारोळा येथील बसस्थानकावरून एका महिलेच्या हातातील बांगड्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच घटना दि.१९ डिसेंबर रोजी घडली याबाबत मंगळवारी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिलाबाई सूर्यवंशी (६६, मोराणे ता. जि. धुळे) यांनी याबाबत फिर्याव दिली आहे. दि. २० रोजी रोकडा फाम ता. भडगाव येथे त्यांच्या भाचीचे लग्न असल्यामुळे त्या दि. १९ रोजी सकाळ ११ वाजेच्या सुमारास पती हंसराज निंबा सूर्यवंशी यांच्यासह मोराणे येथून बसने पारोळा येथे आल्या भडगावसाठी बसमध्ये चढत असतान अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हातातील पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.