मुक्ताईनगर : प्रतिनिधी
शहरात २० डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर प्रवर्तन चौकातील एका व्यावसायिकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी पाच आरोपींना भुसावळ येथून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करताना रवींद्र रमेश खेवलकर त्यांचे वडील रमेश देवचंद खेवलकर आणि भाऊ मंगेश रमेश खेवलकर यांच्यावर चाकूहल्ला करत हातातील रोकडची पिशवी घेऊन आरोपी फरार झाले होते. दरम्यान याप्रसंगी गोळीबार केल्याची देखील माहिती निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व मुक्ताईनगर पोलिस यांच्या संयुक्त तपासात भुसावळ येथील आरोपी निष्पन्न झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अज्ञान असल्याची माहिती आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी तपशील विस्तृतपणे मांडणारा असल्याचे सांगण्यात आले.