जळगाव : प्रतिनिधी
जागेवरील बांधकामाच्या वादावरुन चौघांकडून महिलेच्या भावाला मारहाण केली जात होती. दरम्यान, महिला भावाला त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी पुढे सरसावल्या. याचवेळी मारहाण करणाऱ्यांनी महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली दि. २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी महिलेने न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संशयित राजेश सोमा खडके, किशोर सोमा खडके, प्रशांत सोमा खडके, प्रकाश सोमा खडके सर्व रा. विठ्ठलपेठ खडकेवाडा यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात असलेल्या खळे प्लॉटवर महिलेकडून कायदेशीररित्या बांधकाम केले जात होते. यावेळी त्या परिसरात राहणाऱ्या चौघांनी बांधकामास अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. महिलेने त्यांना दस्ताऐवज दाखविले. मात्र तरी देखील बांधकाम करण्यास मज्जाव करीत साहीत्याची नासधूस केली. महिलेचा भाऊ हा समजूत काढण्यासाठी त्याठिकाणी आला असता, त्याला चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी महिला भावाला त्यांच्या तावडीतून सोडवित असतांना त्या चौघांनी महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला होता. दरम्यान, महिला तक्रार देण्यासाठी पोलिसात गेल्या मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. महिलेने तक्रार दिल्यानंतर केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे महिलेने तक्रारीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संशयित राजेश सोमा खडके, किशोर सोमा खडके, प्रशांत खडके, प्रकाश सोमा खडके यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.