जळगाव : प्रतिनिधी
दिलेली रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत ग्रामसेवकाची फसवणूक केल्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन धुमाळ, बॅग घेऊन जाणारा नीलेश अहिरे या दोघांसह उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकॉ दिनेश भोई (फैजपूर) या पोलिसांचा या प्रकरणात समावेश असल्याचे तपासात समोर आले होते. यातील तीनही पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी काढले