भडगाव : प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूवाहतूक सुरू असून शुक्रवारी रात्री २ ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास किरण धनराज वाघ (४०, भडगाव) हा ट्रॅक्टरमधून अवैध वाळूची वाहतूक करीत असताना भडगाव शिवारात असलेल्या गिरणा नदीपात्रात आढळून आला. त्याच्याविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री २:१५ वाजेच्या सुमारास जुना वाक रस्त्याला गिरणा नदीपात्रात पंडित दत्तू पाटील (३७, महादेव गल्ली भडगाव) हा ट्रॅक्टर (एमएच१९/ बीजी०५९७) मध्ये १ ब्रास वाळूची चोरी करताना आढळून आला.