Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जी.एस.मैदानासमोर रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे शिवकालीन शिवजयंती
    जळगाव

    जी.एस.मैदानासमोर रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे शिवकालीन शिवजयंती

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकात रोटरॅक्ट क्लब जळगावच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवकालीन पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य बॅनर लावण्यात आले होते.


    याप्रसंगी मावळे, सरदार, पेशवे, भालदार, अशी पोशाख घातलेले सदस्य त्या वेळी उपस्थित होते. शिवतीर्थ मैदानावरून पायी मिरवणूक काढून महाराजांची पितळी मूर्ती हातात घेत पालकमंत्री गुलबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी मंत्री गुलाबराव देवकर,पोलीस उपनिरिक्षक कुमार चिंथा,पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक भालचंद्र पाटील यांनी उपस्थिती दिली.

    शिवाजी महाराजांना मानवंदना देत मुजरा करण्यात आला व आरती पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांना वंदन करत शाहिरी पोवड्याने करण्यात आली. शाहीर संग्राम जोशी व संदीप जोशी यांनी या प्रसंगी महाराजांवरील पोवाडा सादर केला. रोटरॅक्टच्या माध्यमातून क्लब चे माजी अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन घडवून आणले. याप्रसंगी पंकज जैन, तरुण अर्तानी, निरंजन देशमुख, जयवर्धन नेवे, देवयानी रसाळ, नितीन नेवे, कृणाल सोनार, प्रा.राजेंद्र देशमुख, लक्ष्मीकांत अडावदकर, स्वप्नील नेवे, सुरेश नेवे, चिन्मय जहागीरदार, विनोद नेवे, संजय कोरके, अजय नेवे, नवीन दलाल, भिकू झवर, जगदीश नेवे आदींनी आपला सहभाग नोंदविला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.