मुक्ताईनगर : प्रतिनिधी
शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या गल्लीत एका व्यावसायिकावर रात्री दुकान बंद करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करत जखमी केल्याची घटना दि. १९ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन्ही मुलेही जखमी झाले. तिघांपैकी एकाची प्रकृती अधिक गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवर्तन चौकात मंगेश रमेश खेवलकर यांचे दुकान आहे. १९ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मंगेश व त्याचा भाऊ रवींद्र आणि वडील रमेश देवचंद खेवलकर हे दुकान बंद करून घराकडे जाण्याच्या तयारीत असतानाच दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पिता व दोघे पुत्र गंभीर जखमी झाले.
मंगेश खेवलकर यांची प्रकृती याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यास छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत. दरम्यान दोघे हल्लेखोर हे एका विना नंबरप्लेटच्या वाहनात आल्याची माहिती आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिस तपास करीत आहेत.