नवी दिल्ली: (वृत्तसंस्था ) ;- सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. एनडीएची परीक्षा 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महिलांना संधी देण्याला विरोध करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. याशिवाय संबंधित घटकांनी त्यांची भूमिका बदलण्याबाबतही फटकारले आहे. तर, न्यायालयाने आदेश दिल्याशिवाय आपण काही करणार नाही का?, अशी विचारणा देखील केली आहे.
नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये अॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर मार्च महिन्यात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बेचसमोर सुनावणी झाली होती.
सरन्यायाधीश बोबडे निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती संजय किशन आणि ह्रषिकेश रॉय यांच्या खडंपीठासमोर सुनावणी झाली. कुश कार्ला यांच्या याचिकेवर न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केले आहेत.