• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महसूलच्या पथकाच्या हल्ल्याप्रकरणी आणखी एकास अटक

editor desk by editor desk
December 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

धरणगाव : प्रतिनिधी

चांदसर येथे वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. दरम्यान, यापूर्वी गणेश विसर्जनाच्या दिवशी चांदसर येथील कोतवालाशी वाळूच्या विषयावरून वाद घातल्याने या संशयितांवर त्या वेळीही गुन्हे दाखल झाले होते. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्लाप्रकरणी पाळधी पोलिसांनी गुरुवारी आबा ईश्वर कोळी (३०), योगेश ईश्वर कोळी (२८) आणि गणेश सोमा कोळी (३५) यांना अटक केली होती, तर रात्री दिनेश सोमा कोळी यास अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर १४ ते १५ जणांनी हल्ला केला होता. यामध्ये तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. वरील चौघांना पाळधी पोलिसांनी धरणगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेतील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सपोनि प्रशांत कंडारे यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व धरणगाव पोलिसांना दिल्या होत्या. गुन्ह्यात वापरलेले दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहेत.

Previous Post

राजकीय व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरणार !

Next Post

भरधाव चारचाकी झाडावर आदळली ; तीन तरुण ठार तर तीन गंभीर !

Next Post
भरधाव चारचाकी झाडावर आदळली ; तीन तरुण ठार तर तीन गंभीर !

भरधाव चारचाकी झाडावर आदळली ; तीन तरुण ठार तर तीन गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group