• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नशिराबाद येथे राष्ट्रवादीतर्फे 2200 जणांना रेशन कार्ड वाटप

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 19, 2022
in जळगाव, सामाजिक
0
नशिराबाद येथे राष्ट्रवादीतर्फे 2200 जणांना रेशन कार्ड वाटप

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाच्या सौजन्याने 2200 जणांना रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते नागरिकांना रेशन कार्ड देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांच्या प्रयत्नांनी नागरिकांना हे रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात अनेक नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. कधीकधी दलालांकडून त्यांची आर्थिक लूट होते. ही सर्व परिस्थिती पाहता पंकज महाजन यांनी नशिराबादच्या नागरिकांची ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आज नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड मिळत आहे. तसेच गावातील अनेक विकासकामांचा त्यांनी पाठपुरावा करून ही कामे तडीस नेली आहेत, असे गौरवोद्गार श्री खडसे व श्री देवकर यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात श्री महाजन यांनी अनेक विकासाची कामे पाठपुरवठा करून आपल्याकडून करून घेतली, याची आठवणही श्री देवकर यांनी करून दिली.

कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे एजाज मलिक, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, योगेश देसले, विलास पाटील, अशोक लाडवंजारी, उमेश नेमाडे, बापू परदेशी, लीना महाजन, पंकज महाजन, सय्यद बरकत अली, चंद्रकांत पाटील, सांडू पैलवान, निलेश रोटे, आयुब मेंबर, चांद मेंबर, नजीर अली सय्यद, मुस्ताक मिस्त्री आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन

Next Post

जी.एस.मैदानासमोर रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे शिवकालीन शिवजयंती

Next Post
जी.एस.मैदानासमोर रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे शिवकालीन शिवजयंती

जी.एस.मैदानासमोर रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे शिवकालीन शिवजयंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group