पाचोरा : प्रतिनिधी
कुन्हाड तांडा येथे कापसाला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हाड तांडा येथील शेतकरी गजानन मदन तवर (वंजारी) (५६) या शेतकऱ्याने आपली तिन्ही मुले परराज्यात ऊसतोडणीसाठी गेली आहेत. पत्नी शेतात गेली होती. सायंकाळच्या वेळेस गळफास घेतला. सायंकाळी पत्नी शेतातून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मयत शेतकऱ्याच्या नावावर दोन ते तीन बिधे शेती होती. यावर्षी शेतात खरीप हंगामाने साथ न दिल्याने तसेच लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न अत्यल्प येत आहे. घरात आलेल्या कापसाला भाव न राहिल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिस पाटील संतोष कोळी यांनी पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनला दिली.