Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात २५० रिक्षांवर कारवाई
    क्राईम

    जळगावात २५० रिक्षांवर कारवाई

    editor deskBy editor deskDecember 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    विना परवाना रिक्षा चालवणे, कागदपत्रे नसे, गणवेश न घालणे यासह नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतुक शाखेच्या वतीने बुधवारी सकाळपासून कारवाईची मोहीम राबविली. दोनशे पोलीसांच्या फौजफाट्याासह शहरात विविध ठिकाणी २५० रिक्षांवर कारवाई करुन त्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आल्या, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

    शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच शहरात होणारे अपघात टाळण्यासाठी गेल्या आठवड्यात शहर वाहतुक शाखेकडून महाविद्यालयालयीन विद्याथ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली होती. यावेळी शंभराहून अधिक दुचाकी जप्त करुन त्यांच्या पालकांना दंड ठोठवण्यात आला होता. त्यानंतर आता रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली. शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात रिक्षांची संख्या वाढली आहे. वाढत्या रिक्षांसह अनेक रिक्षा चालकांकडून कागदपत्र अपूर्ण ठेवणे, गणवेश न घालणे, ऑनलाईन दंड प्रलंबित ठेवणे, बॅचबिल्ला न बाळगणे अशा वेगवेगळ्या त्रुटी रिक्षाचालकांकडे तपासणीवेळी आढळत नाही. तसेच रिक्षा चालविताना वाहतूक नियमांचा भंगदेखील केला जातो. या शिवाय महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी जादा भाडे घेवून प्रवाशांची अडवणूक केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे सर्व रिक्षा चालकांची आवश्यक कागदपत्रांसह माहिती उपलब्ध असावी, यासाठीदेखील मोहीम हाती घेण्यात आली होती.

    बुधवारी सकाळपासूनच पोलिस दलाकडून एकाचवेळी रेल्वे स्थानक परिसर, बसस्थानक, अजिंठा चौक, प्रभाग चौक, इच्छादेवी चौक, नेहरु चौक, सुभाष चौक तसेच आकाशवाणी चौक व इतर भागातील रिक्षा स्टॉपसह शहरात प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा तपसाणीची मोहीम सुरु केली. यामध्ये सुमारे अडीचशे रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियमभंग केल्याचे आढळून त्यामुळे त्या रिक्षांवर पोलिसांनी कारवाई करुन त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा केल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.