Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कृषी सेवा केंद्रास भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान !
    क्राईम

    कृषी सेवा केंद्रास भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान !

    editor deskBy editor deskDecember 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शहरातील नगरपालिकेसमोरिल शॉपिंग सेंटरमधील कृषी सेवा केंद्रास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तत्काळ पालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने ही आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी कृषी केंद्र चालकाचे जवळपास ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानक रोडवर रामराव पाटील यांनी गेल्या ६ महिन्यांपूर्वी धरती धन कृषी सेवा केंद्र या नावाने भाडेतत्त्वावर दुकान सुरू केले होते. १८ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळेस ग्राहक नसल्याने रामराव पाटील हे सायंकाळी ५ वाजता कृषी सेवा केंद्र बंद करुन शहरातील गणेश कॉलनी स्थित घरी निघून गेले. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता धरती धन कृषी सेवा केंद्रातून आगीचे लोट उसळु लागल्याने परिसरात खळबळ उडाली. क्षणार्धात या आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत रामराव पाटील यांच्या दुकानात असलेले खते, बि बियाणे, रासायनिक खते असे जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रसंगी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.