जळगाव : प्रतिनिधी
जळगाव ते भुसावळ मार्गावर आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी शांता कमलाकर वाणी (७८, रा. मुक्ताईनगर परिसर, जळगाव) यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना १६ डिसेंबर रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी १७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते भुसावळ मार्गावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. शांता वाणी यादेखील या धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ. दत्तात्रय बडगुजर करीत आहेत