नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते माजी मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, छगन भुजबळांनी अजून संपर्क केला नसला तरी छगन भुजबळ अधून-मधून माझ्या संपर्कात असतात, नाराज लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटत आहे, असेही त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेतर ठरवायला आणखी थोडा वेळ घेतला तर काय हरकत आहे. भुजबळांसह अनेकांच्या बाबतीत मला वाईट वाटले. काही जणांचे जॅकेट वाट बघत असतील अशा लोकांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. अजितपवर कुठे आहे हे पहाटे बघा असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, या सरकारची झाली आहे दैन म्हणून भुजबळांचा वहा नही रैहना हे अगदी बरोबर आहे. भाजपच्या काळात संविधान, लोकशाहीचे धिंदवडे निघत आहेत. शपथविधीच्या पासवर राजमुद्रा नसल्याच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीत मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे, त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक हे होता कामा नये. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझे तर असे स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे.