चोपडा : प्रतिनिधी
चोपडा – यावल रस्त्यावर नावरे फाट्याजवळ कॅटर्सचे साहित्य आणि कामगार घेऊन जाणाऱ्या वाहनाचा सोमवारी सकाळी अपघात झाला. या अपघतात ४ महिला जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी धाव घेतली व जखमी महिलांना तेथून उपचाराकरिता जळगावला हलवले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही तरी केटर्सचे साहित्य तसेच तयार जेवण सांडले जावून नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा – यावल रस्त्यावर साकळी गावाच्या पुढे यावल कडे जातांना नावरे फाटा आहे. या फाट्याजवळ सोमवारी सकाळी जळगाव येथून दहिगाव या गावात कॅटर्सचे साहित्य आणि कामगार घेऊन जाणारे वाहन क्रमांक एम. एच. १९ बी.एम. ५७२२ यास अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनातील चार महिला जखमी झाल्या.
अपघात घडल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती छोटू उर्फ रवींद्र पाटील, यावल शहर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख पंकज बारी हे तेथे दाखल झाले. त्यांनी जखमींना मदत केली. या अपघातात जखमी महिलांना जळगाव येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहून रस्त्याच्या कडेच्या चारीतुन बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नसली तरी तयार जेवण घेऊन जात असलेल्या या वाहनातील जेवणाची भांडी रस्त्यात त्या कडेला उलटून मोठे नुकसान झाले आहे.