पाचोरा : प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू असून, महसूल पथकाला गुप्त माहिती मिळताच प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गिरड येथून रविवारी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले.
यावेळी पथक प्रमुख भडगाव तहसीलदार शीतल सोलट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, योगेश पाटील, अभिमन्यू वारे, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महसूल सहायक महादू कोळी, लोकेश वाघ यांनी चोख कामगिरी केली. मौजे कराब (ता. भडगाव) येथून दि. १५ रोजी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारा १ ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले.
मौजे परधाडे (ता. पाचोरा) येथून अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले, तर दोन ट्रॅक्टर पोलिसपाटील यांच्याकड़े जमा केले. या कारवाईत निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर. डी. पाटील व वन्हाडी ग्राम महसूल अधिकारी अतुल पाटील, निखिल बळी, अमोल शिंदे, आदित्य सुरनर, अजमलशा मकानदार, तेजस भराटे, प्रदीप काळे व वाहनचालक विश्वेश यांनी ही कारवाई केली. वडदे (ता. भडगाव) येथून वाळूने भरलेले ट्रॅक्टर आयटीआय येथे जमा केले. यावेळी पथक प्रमुख भरत पाटील, ग्राम महसूल अधिकारी शुभम चोपडा, योगेश पाटील, संजय सोनवणे, समाधान हुलुहुले, पाशा हलकारे, महसूल सहाय्यक महादू कोळी, महसूल सेवक किरण मोरे, समाधान माळी उपस्थित होते.