जळगाव प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील जय भोले नावाच्या कंपनीतून चोरी करून रोकड लांबविणाऱ्या चोरट्याला अटक करून १ लाख ३ हजारांची रोकड जप्त केल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी कळविले आहे.
सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथील व्यापारी अमर दयालदास कटियारा वय ४२ यांची एमआयडीसीतील जी २० सेक्टर येथे जय भोले नावाची कंपनी आहे. कंपनी बंद असतांना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी कंपनीचे कुलूप तोडत कंपनीत प्रवेश करीत कंपनीच्या ऑफिसमधील १ लाख ५२ हजारांची रोकड व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यागुन्ह्यातील संशयित आरोपी भिमकुमार प्रभास यादव रा. बिहार यांला ११ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी चोरलेल्या रोकडची माहिती घेतली असता सर्व मुद्देमाल भोपाळ येथे ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार संशयित आरोपी भिमकुमार यादव याला सोबत नेवून सपोनी अमोल मोरे, रतिलाल पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांनी गुरूवारी १७ फेब्रुवारी रोजी भोपाळ येथून चोरीचे १ लाख ३ हजार रूपये हस्तगत केले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी याला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार करीत आहे.