Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
    क्राईम

    बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

    editor deskBy editor deskDecember 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने १४ रोजी दुपारी ३ वाजता करगांव रोडलगत असलेल्या दयानंद – हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. याप्रकरणी तिघांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला व या छाप्यात ६ हजार रुपये किमतीचे घरगुती वापराचे २ गॅस सिलिंडर, १५ हजार रुपये किमतीचे गॅस भरण्याचे उपकरण, ८० हजार रुपये किमतीची रिक्षा व ८० हजार रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा असा एकूण १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

    पोलिस हवालदार राहुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला संदीप शरद जाधव (३२, नेताजी चौक), रिक्षाचालक समाधान भरत मोरे (३६, डेराबर्डी), रिक्षाचालक धुडकू सुकदेव वाघ (३८डोणदिगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून मोटरपंपच्या सहाय्याने रिक्षामध्ये गॅस भरताना आढळून आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक गणेश सायकर, हेकॉ. राहुल सोनवणे, अमित बाविस्कर, प्रवीण जाधव, भूषण पाटील, पोकॉ. दीपक चौधरी यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.