Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या इसम जागीच ठार
    क्राईम

    भरधाव वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या इसम जागीच ठार

    editor deskBy editor deskDecember 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे पायी जात असलेल्या रामचंद्र धनू माळी (५७, रा. रामेश्वर कॉलनी) हे ठार झाले. हा अपघात १३ रोजी राष्ट्रीय महामार्गावर एक नर्सरीजवळ झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील शांतीनारायण नगरात राहणारे रामचंद्र माळी हे १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरून पायी जात होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती. यामध्ये रामचंद्र माळी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून पसार झाला. याप्रकरणी गोपाल रामचंद्र माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून १४ रोजी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि सचिन नवले करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.