जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने शहरातील मानियार बिरादरीतर्फे गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील चार वर्षीय बालीके सोबत अत्याचार करणाऱ्या आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास जिल्हा न्यायालयाने ६० दिवसात निकाल देत मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानिमित्ताने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांचा गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयात जावून सत्कार करण्यात आला.
जळगाव पोलीस दल व सरकारी वकील यांनी शासनातर्फे उच्च न्यायालयात दाद मागून आरोपी सावळाराम शिंदे या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी देखील जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केली आहे. याप्रसंगी मनियार बिरादरीचे ॲड. आमीर शेख, अध्यक्ष फारुक शेख, खजिनदार ताहेर शेख, सदस्य तय्यब शेख, रफिक शेख, तनवीर शेख, मुजाहिद खान व अलताफ शेख आदी उपस्थित होते.