जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले असून महायुतीने मुख्यमंत्रीपदी देवेद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवारांनी शपथ घेतली मात्र गेल्या काही दिवसापासून मंत्री मंडळाचा विस्तार झालेला नव्हता तो आज होत आहे. यात जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आ.गुलाबराव पाटील हे देखील मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले गुलाबराव पाटील हे यंदाच्या सरकारमध्ये तिसऱ्यादा मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील भूषविले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यात संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना या मंत्रीमंडळ विस्तारात चांगले खाते मिळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.