जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्टेशनजवळील जून्या मालधक्क्याजवळ सुमारे ७५ वर्षीय अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या अंगात लाल, निळी व पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
याप्रकरणी डीवायएसएस सुनिल आर. पाटील यांनी दिलेल्या लेखी खबरीवरुन लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस नाईक चौघरी यांनी केले आहे.