• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात होमगार्डचा वर्धापन दिन समारोप समारंभ उत्साहात

editor desk by editor desk
December 14, 2024
in जळगाव, राज्य
0
जळगावात होमगार्डचा वर्धापन दिन समारोप समारंभ उत्साहात

जळगाव : प्रतिनिधी

जळगांव जिल्हयात होमगार्ड संघटने तर्फे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह दि. ७ ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन जिल्हयात ऊत्साहाने साजरा करण्यांत आला.

सदर कालावधीत सर्व तालुका पथकांमध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, प्रथमोपचार विमोचन, पथनाटय ईत्यादि विषयाबाबत शाळा, सार्वजनिक ठिकाणी प्रात्यक्षीक देण्यांत आले तसेच पथनाटयाच्या माध्यमातुन वाहतुक नियमांचे पालन, तंटामुक्ती, सामाजीक एकता ईत्यादीबाबत शहरातील मुख्य चौकात जनजागृती करण्यांत आली. वरील प्रकारच्या सर्व उपक्रमांमध्ये होमगार्डसने स्वच्छेने सहभाग नोंदवीला.

दि.१४/१२/२०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जळगांव येथे पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदानावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन मा. सुरेश दामु भोळे, (राजु मामा) आमदार जळगांव विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री. अशोक नखाते, जिल्हा समादेशक होमगार्ड, तथा अपर पोलीस अधिक्षक जळगांव यांचे अध्यक्षतेखाली सदर ७८ वा होमगार्ड वर्धापन दिनाच्या सांगता समारोप समारंभाचे आयोजन करण्यांत आले होते.

सदर प्रसंगी मा. आ. राजु मामा भोळे यांचे हस्ते ध्वजा रोहण करण्यांत आले. व त्यांना परेड संचलन करुन मानवंदना देण्यांत आली, प्रमुख अतिथींचे स्वागत श्री. अशोक नखाते, जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी शाल, श्रीफळ, प्रतिक चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले तसेच मा. जिल्हा समादेशक होमगार्ड श्री. अशोक नखाते यांचे स्वागत श्री. संजय पाटील, समादेशक अधिकारी होमगार्ड जळगांव यांनी शाल, श्रीफळ, प्रतिक चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले, तसेच प्रशिक्षणार्थी डिवाय. एस. पी. श्री केदार पी. बारबोले यांचे स्वागत श्री. संदिप हमीद तडवी, केंद्र नायक होमगार्ड जळगांव यांनी केले. परेड संचलनाचे नेतृत्व श्री. सुनिल पाटील, कंपनी कमांडर होमगार्ड जळगांव यांनी व सहायक म्हणुन श्री. रविंद्र ठाकुर, वरिष्ठ पलटन नायक, होमगार्ड जळगांव यांनी केले परेड संचलनामध्ये होमगार्डच्या ४ प्लाटुन ने सहभाग घेतला कार्यक्रमाध्ये मागील वर्षभरात ऊत्कृष्ट कामगीरी केलेल्या अधिकारी/होमगार्ड यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यांत आला. तसेच ७८ वा होमगार्ड वर्धापन दिना निमीत्त मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा. गृहमंत्री, मा. महानिदेशक होमगार्ड दिल्ली, मा. गृहसचिव दिल्ली ईत्यादीचे शुभेच्छा संदेश प्राप्त झालेले होते. त्याचे वाचन श्री. नरविरसिंग पी. रावळ, समादेशक अधिकारी होमगार्ड भुसावळ यांनी केले.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. अशोक नखाते, जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी होमगार्ड कार्याचा गौरव करुन सर्व होमगार्डसना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षीय भाषण मा. आ. राजु मामा भोळे यांनी केले. त्यात त्यांनी होमगार्डच्या प्रलंबीत प्रश्नांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हयातील सर्व तालुका समादेशक/प्रभारी अधिकारी व पथकातील सर्व अधिकारी तसेच ५०० होमगार्ड उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. ओमप्रकाश शर्मा, माजी होमगार्ड अधिकारी यांनी केले. सप्ताहा यशस्वितेसाठी श्री. संदिप ह. तडवी, केंद्र नायक होमगार्ड, श्री. मदन र. रावते, सा.प्र.सुभेदार, समादेशक अधिकारी श्री. संजय पाटील, कंपनी नायक श्री. सुनिल पाटील, व.प.ना. श्री. रविंद्र ठाकुर, कं.ना. कडु सपकाळे तसेच जळगांव पथकातील सर्व अधिकारी व होमगार्ड यांनी अथक परीश्रम घेतले.

Previous Post

अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात लाईव्ह कार्यक्रम

Next Post

कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी जवळीक वाढणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी जवळीक वाढणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group