Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या सुमारास भीषण अपघात : तीन तरुणाचा जागीच मृत्यू !
    क्राईम

    रात्रीच्या सुमारास भीषण अपघात : तीन तरुणाचा जागीच मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृतसंस्था

    जिल्ह्यातील अमडापूर येथे दि.१३ रोजी शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’ चा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये चिखली वरुन उदयनगर कडे जाणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होते की, हे तरुण जागेवरच मृत पावले. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालकांने घटनास्थळावरून पळ काढला. आता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील तीन तरुणांचा जागच मृत्यू झाला. या मृतांमध्ये पंचवीस वर्षे वयाचा प्रतीक भुजे, 26 वर्षे वयाचा प्रथमेश भुजे आणि सौरभ शर्मा या तीन तरुणांचा समावेश आहे. याती प्रतीक आणि प्रथमेश हे चुलत भाऊ असून सौरभ हा त्यांचा मित्र होता. हे तिघे चिखलीहून उदयनगर येथे जात होते. मात्र, त्याचवेळी अमडापूर परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोडदार धडक दिली.

    सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच तिन्ही तरुणांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सध्या पोलिस करत आहेत. त्या माध्यमातून धडक देणाऱ्या वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या अपघातात तिन्ही तरुणांचा असा अंत झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या अपघातातील वाहन चालकाला लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.