धरणगाव : प्रतिनिधी
दि.१४ रोजी पहाटे धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार आणि २१ प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०)ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर बसमधली २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील बसचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
जाकीर शब्बीर खाटीक (वय -३५, रा. पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय -६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय -२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे वय-४५, शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळयात), रमेश सोनू मराठी वय-७५, कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५), वरुड प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (वय -३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (वय -७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (वय -५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) असे प्रवासी जखमी झालेले आहेत.
दरम्यान या भीषण अपघातात जखमी झालेल्या २१ प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षण पवन दिसले यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. यासंदर्भात अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतल्याचे दिसून आले.