जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटना नेहमीच वाढत असतांना नुकतेच जळगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला केला आहे. यात शहर डीबी पथकाकडून एकुण १९ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाणे अंतर्गत वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी झाल्याचे प्रकार उघडकीला आले होते. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा चित्रा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयित आरोपी आशीफ बशीर पटेल वय -३५, रा. दहिगाव ता. यावल याला चोरीच्या दुचाकीसह चित्रा चौकातून अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबूल केली आहे. त्यांनी या दुचाकी जळगाव शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा बीड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केल्याचे निष्पन्न झाले आहे.
यांनी केली कारवाई
यांनी केली कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिकारे, पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव, सहायक फौजदार सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकूर, संतोष खवले, उमेश भंडारकर,श्री पांचाळ, प्रणय पवार यांच्यासह इतरांनी केली आहे.