जळगाव : प्रतिनिधी
बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी वॉचमन किरण मानसिंग राठोड (३६, रा. विद्यानगर) यांच्या घरातून रोख रकमेसह मोबाइल, भांडे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी (१२ डिसेंबर) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण राठोड हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत जय अशोक राजपूत (१९, मयूर कॉलनी, पिंप्राळा) याने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून रोख दोन हजार १०० रुपयांची रोकड, दोन हजारांचा मोबाइल, एक हजार ३०० रुपयांची स्वयंपाकाची भांडी असा एकूण पाच हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पळण्याच्या तयारीत होता. मात्र राठोड यांनी त्यास रंगेहात पकडले.