जळगाव : प्रतिनिधी
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धक्का दिल्याने गीता भगवान पाटील (४२, रा. माळपिंप्री, ता. जामनेर) या ठार झाल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भास्कर पाटील (रा. माळपिंप्री, जामनेर) व त्यांची काकू गीता पाटील हे २ डिसेंबर रोजी दुचाकीने वावडदा येथे जात होते. त्या वेळी विटनेर गावाजवळ एका ढाब्यासमोर ट्रॅक्टरने दुचाकीला धक्का दिला. त्यात गीता पाटील या ठार झाल्या.