Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
    जळगाव

    मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद महामार्गावर भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश रमेश चौधरी (वय-३२) रा. चिलगाव ता. जामनेर जि. जळगाव हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरून विमानतळाजवळून जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारी (एमएच ४६ एएफ ३८७१) मालवाहू पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडकेत दुचाकीस्वार अविनाश चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अविनाश चौधरी यांच्या जबाबावरून बुधवार १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मालवाहू पिकअप व्हॅनवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.