Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तर मग ठरलं : ‘या’ दिवशी होणार राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
    राजकारण

    तर मग ठरलं : ‘या’ दिवशी होणार राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

    editor deskBy editor deskDecember 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात महायुतीने सरकार स्थापन केले आहे तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार त्यापूर्वी होताना दिसत आहे. अशातच येत्या १५ तारखेला नागपुरात मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती होती. ती माहिती खरी ठरली आहे.

    येत्या १६ तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच १५ डिसेंबर रोजी नागपुरातच शपथविधी होणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, याउद्देशाने शनिवारऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे १०, शिवसेनेचे १२ आणि भाजपचे २१ मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.