नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अवघ्या देशभरात ‘पुष्पा २’ सिनेमाचा धुमाकूळ सुरु असतांना हैदराबाद येथे ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलीसांनी अभिनेता अल्लू अर्जून याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान अल्लू अर्जुन पोलिसांना न कळवता प्रीमियरला गेला होता असा आरोप करण्यात आला होत. ज्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली आणि चेंगराचेरीत महिलेचा मृत्यू झाला. शिवाय महिलेच्या मुलाची प्रकृती देखील चिंताजनक आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध विविध कलमांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
मृत महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून ५ डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्लू अर्जुनच्या अगोदर हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही सूचना नव्हती. थिएटर व्यवस्थापनानेही गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नाही. रेवती (वय ३५) आणि तिचा मुलगा श्री तेज (वय १३) यांना मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीमुळे चिरडले गेले होते.