धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच धरणगावजवळ आज दि.१३ डिसेंबर रोजी पहाटे बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. धरणगाव तालुक्यातील दोनगाव जवळ असलेल्या स्मशानभूमी जवळ बसवरचा ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात आज दि.13 रोजी सकाळी 6 वाजेला झाला. यात 28 प्रवाशी जखमी झाले असून यामध्ये विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक एमएच १४ बीटी २८८७ नेहमीप्रमाणे १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली गावावरून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली. रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोनगावा जवळ स्मशानभूमीच्या वळणावर भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील (वय ५६, रा.लाडली ता.धरणगाव) यांचा ताबा सुटल्याने वळणा वरील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. इलेक्ट्रिक खंबामुळे पुढील अनर्थ टळला जर इलेक्ट्रिक खंबा जर नसता तर बस थेट नाल्यामध्ये गेली असती. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये मयुरी पाटील वय-१४, आधार सोनवणे वय-४५, लावण्या सोनवणे वय-११, सायली पाटील वय-१५ हर्षा पाटील वय-१३, गुंजन सपकाळे वय-१६ जनाबाई पाटील वय-५५, अजय पाटील वय-१३, कुंदन पवार वय-१३, सुनीता भिल वय-४६, काजल पाटील वय-१५, मोहिनी शारद पाटील वय-१७, भावना शांताराम पाटील वय-१६,अशोक जगन पाटील वय-५७, वालात्री शंकर शिरसाट वय-५३, कुणाल गुंजाळ पवार वय-१३, रेखाबाई विशाल दांडेकर वय-२५ सर्व रा. रेल ता.धरणगाव, जिजाबाई पंढरीनाथ पाटील वय-६२, पंढरीनाथ आत्माराम पाटील वय-६७, दोन्ही रा. लाडली ता. धरणगाव, जगन भीमराव पवार वय-४२, विश्वनाथ सदाशिव पाटील वय -७१, निखिल सुधाकर पाटील वय-२३, तन्मय मंगल पाटील वय-१९, गुंजन सुनील पाटील वय १४, विवेक छगन पाटील वय -१७, राम शरद अवचिते वय-१३, जयेश चंद्रकांत पाटील वय-१६, सायली सुरेश पाटील वय-१७ सर्व रा. रेल ता.धरणगाव यांचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.