जळगाव : प्रतिनिधी
जूनियर कॉलेज संघटनेतर्फे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले NES boys शाळेत शाळेत एका छोटे खाणे कार्यक्रमानिमित्ताने साहेब आले होते.
आ.तांबे यांना संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. शशिकांत पाटील सर तसेच उपाध्यक्ष विजयकांत पाटील सर सचिव प्रभाकर पाटील सर तसेच जिल्हा संघटनेचे कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. संदीप पाटील सर यांनी सादर केले. विधानसभेत आमच्या मागण्यांच्या सकारात्मक विचार व्हावा असे निवेदन देण्यात आले पदवीधर आमदार यांच्या निधीतून संगणक व पोडियम साहित्य आमदार साहेबांच्या स्थानिक निधीतून शाळांना वाटप करण्यात आले.
त्याच प्रसंगी माननीय तांबे साहेबांनी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोग करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करावे व स्वतः तंत्रसायक बनावे असा संदेश दिला या छोट्या खाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक पतपेढी चे संचालक सचिन विठ्ठल पाटील यांनी केले