जामनेर : प्रतिनिधी
बनावट तृतीयपंथींयाना भिक्षा मागताना पकडल्याने चौघांनी बनावट तृतीयपंथीयांना मारहाण केली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. यावेळी या बनावट तृतीयपंथीयाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी जामनेर येथील आठवडे बाजार असल्याने भुसावळ येथील तृतीयपंथी तेथे येत असतात. आज काही बनावट तृतीयपंथी भुसावळ रस्त्यावरील विशाल लॉनजवळ भिक्षा मागत असल्याचे पाहून हा प्रकार घडला. लक्ष्मी रेणुका जोगी (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भावना कुंवर, चुटकी कुंवर, रेश्मा कुंवर, दुर्गा कुंवर (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट तृतीयपंथीयांना पोलिस ठाण्यात आणल्याचे पाहून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.