बोदवड : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडून बोदवड मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे एक चारचाकी वाहन पकडून पोलिसांनी १८ लाखांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी पहाटे बोदवडजवळ करण्यात आली. एक चारचाकी (एमएच २०/ जीड़ोड ०४७२) गुरुवारी पाच वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जात असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला.
त्यांनी या गाडीला जामनेर रस्त्यावरील गोशाळेजवळ अडवत तपासणी केली असता गाडीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा (सुमारे १८ लाख ७६ हजार ८० रुपयांचा) आढळून आला. शयाबाबत पोलिस उपनिरीक्षक सुमित पाटील यांनी आरोपी चालक राकेश अरुण नवगिरे, वाहक योगेश लहू लोखंडे (दोन्ही रा. बोकूड जळगाव, ता. पैठण, जि, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा नोंद करत वाहनही जप्त करण्यात आले