धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिखलोद येथे साई लीला युवा क्रीड मंडळाच्या वतीने आयोजित १८ वर्षीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य हिंमत आबा पाटील यांच्यावतीने प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चिखलोद येथे साई लीला युवा क्रीडा मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात १८ वर्षीय वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील यांच्याकडून दिले गेलेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस विखरण ता.एरंडोल यांनी पटकावले. माजी सरपंच नंदलाल पाटील यांनी दिलेले दुसरे बक्षिस हे साई लीला ग्रुप चिखलोद या संघाने पटकावले तर तिसरे बक्षीस हे स्वाभिमानी शेतकरी जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील यांनी दिले हे धुळे ह्या संघाने पटकावले.
क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य दादासाहेब सुनीलभाऊ पाटील, साईलीला गृपचे अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजन वाल्मीक कापडणे, दिपक पाटील यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच महेंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पवार, ग्रा.पं. सदस्य रावण पाटील, किशोर पाटील यांच्यासह गावातील तरूणांनी परिश्रम घेतले.