जळगाव : प्रतिनिधी
भरधाव डंपरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे आसिफ कुरेशी हाजी शौकत कुरेशी (४०, रा. आयेशा नगर, सुप्रीम कॉलनी) हे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (११ डिसेंबर) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरएल चौफुलीजवळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी हे गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रीम कॉलनी परिसरातील आयेशानगरात राहतात. वॉल पेपर लावण्याचे काम करणारे कुरेशी बुधवारी दुपारी सुप्रीम कॉलनीकडून दुचाकीने (क्र. एमएच १९, डीसी १७५१) शहरात येत होते. त्यावेळी आरएल चौफुलीजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या डंपरने (क्र. एमएच १९ सीएक्स ४९४०) जोरदार धडक दिली. त्यातदुचाकीस्वार आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगा असा परिवार आहे.
अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून सुप्रीम कॉलनी परिसरातील काहीजण जात होते. त्यावेळी त्यांना अपघातग्रस्त वाहने दिसली. त्यावेळी दुचाकीवरून मयताची ओळख पटली. एका जणाने रिक्षामधून कुरेशी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले.