• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बंद घर फोडणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

editor desk by editor desk
December 12, 2024
in क्राईम, जळगाव, मुक्ताईनगर
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

शहरातील गोदावरी नगर परिसरातील बंद घरात घुसून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या दोघा अटल चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अनेक गुन्ह्यात या चोरट्याचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामा अण्णा पवार (वय २७, रा. भोकरदन, जि. जालना) असे या चोरट्याचे नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ११ डिसेंबरच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास आरोपी राम अण्णा पवार व त्याचा एक साथीदार अशा दोघांनी गोदावरी नगर परिसरात राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी जयश्री थेटे यांच्या घरात कडीकोंडा तोडून प्रवेश घेतला होता. या परिसरात इतर ठिकाणी देखील चोरी करण्याचा त्यांचा मानस होता. अशातच बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला असलेले अतुल बोदडे यांना या घरात चोर लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यांनी – तत्काळ स्थानिक मुक्ताईनगर पोलिसातील सचिन जाधव, सुरेश मेढे गोविंदा सुरवाडे यांना फोन करून बोलावून घेतले व सापळा रचत रामा अण्णा पवार यास ताब्यात घेतले. यादरम्यान एक संचयित आरोपी मात्र फरार झाला. दरम्यान, बंद घराच्या मालकीण जयश्री थिटे या पुणे येथे गेलेल्या असल्याने अद्याप पावतो गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

अतुल बोदडे हे बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला आहेत. मंगळवारी त्यांची सुटी असल्याने ते घरी होते. रात्रीच्या सुमारास थेटे यांच्या घरात कोणीतरी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी इतर स्थानिक कर्मचाऱ्यांना फोन केला असता पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळाकडे रवाना केले. याप्रसंगी आरोपींनी दगड आणि लोखंडी पाइपने देखील मारण्याचा प्रयत्न बोदडी यांना केला, मात्र भीती न बाळगता बोदडे यांनी पवार यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

Previous Post

मनपा लाच प्रकरण : मनपा आयुक्तांची झाली चौकशी !

Next Post

जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Next Post
जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात.

June 26, 2025
किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group