जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी संदीप भटू पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा पोलिस दलातील १२ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले.
जनसंपर्क अधिकारी सपोनि शीतलकुमार नाईक यांची शहर पोलिस ठाणे, जिल्हा विशेष शाखेतील अनिल मोरे यांची भुसावळ शहर, राहुल तायडे यांची एमआयडीसी, राहुल मोरे यांची यावल, दंगा नियंत्रण पथकातील नीलेश गायकवाड यांची भुसावळ बाजारपेठ, जामनेर पोलिस ठाण्यातील सागर काळे यांची भडगाव, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांची डायल ११२ व नियंत्रण कक्ष, एमआयडीसीतील शरद बागल यांची स्थानिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्षातील योगेश ढिकले यांची शनिपेठ, शनिपेठ पोलिस ठाण्यातील चंद्रकांत धनके यांची एमआयडीसी, चोपडा शहरचे विजय देवरे यांची नियंत्रण कक्षात तर भडगाव येथील शेखर डोमाळे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.