धरणगाव : प्रतिनिधी
नाशिक येथील ज्ञानसिंधु प्रकाशन संस्थेचा वतीने येथील तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष तसेच कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामांची दखल घेत ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक या संस्थेच्या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात त्यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधु समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे लेखी पत्रक संस्थेचा वतीने प्रकाशक व अध्यक्ष तान्हाजी खोडे यांनी सुनील चौधरी यांना दिले.
सदर पत्रकात सुनील चौधरी यांना सहकुटुंब दि.२१ शनिवार रोजी ठिक १२ वाजता राणी भवन, अशोक स्तंभ चौक, नाशिक येथे पुरस्कार स्विकारण्यासाठी आमत्रित करण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे समाज बांधव व हितचिंतक मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.