जळगाव : प्रतिनिधी
दुर्धर आजाराला कंटाळून लीलाधर गोविंदा खडसे (वय ५३, रा. भादली ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली येथील लीलाधार पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेतला. मंगळवारी पहाटे पाच वाजता त्यांचा मुलगा गणेश हा झोपेतून उठल्यावर त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्याने वडीलांचा मृतदेह बघताच मनहेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.