जळगाव : प्रतिनिधी
भरधाव मालवाहू वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सतिलाल मधुकर पाटील (४४, रा. रामेश्वर कॉलनी) हे जखमी झाले. अपघात दि. १ डिसेंबर रोजी आर.एल. चौफुलीजवळ घडला. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध दि. ९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका अपघातात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे तिघे जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रतिलाल पाटील दुचाकीने आर. एल. चौफुलीकडून एका हॉटेलकडे वळण घेत होते. समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एम.एच. ०४ एच.एच. ६८६७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पाटील यांचा पाय वाहनाखाली दाबला गेला. डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. पंकज पाटील करीत आहेत.
दुसऱ्या एका अपघातात भरधाव वाहनाने (एमएच ०४, एफएफ २०९६) दुचाकीला धडक दिल्यामुळे इकबाल अली लियाकत अली (३७, रा. पिंप्राळा हुडको), शरीफ बेग व सईद शेख जखमी झाले. हा अपघात १९ नोव्हेंबर रोजी तरसोद फाट्याजवळ झाला. या प्रकरणी इकबाल अली लियाकत अली यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. अलियार खान करीत आहेत.