जळगाव : प्रतिनिधी
नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा राग आल्याने नितीन जाधव (रा. दादावाडी) याने महेंद्रकुमार पगारे (रा. दादावाडी) व त्यांच्या पत्नी पद्मिनी पगारे यांची कार अडवून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार ८ डिसेंबर रोजी दादावाडी तसेच काव्यरत्नावली
चौकाजवळ घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जाधव याने बदली केल्याच्या रागातून महेंद्रकुमार व त्यांच्या पत्नी जात असलेल्या कारसमोर दुचाकी आडवी लावून कार अडवली. त्यानंतर महिलेच्या पतीला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पद्मिनी पगारे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नितीन जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे