बोदवड : प्रतिनिधी
शहरातील भिल्लवाडीतीला एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यातून शहरात खळबळ उडाली. घटनेची दखल घेता पोलिसांनी बंदोबस्त लावला असून दुकाने बंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान शहरातील बस स्थानका जवळ लहान मुलांचे भांडण झाले त्यात भिल्लवाडीत राहणाऱ्या उखा भिल या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून बाजारपेठ बंद करण्यात आली आहे