जामनेर : प्रतिनिधी
शहरातील शास्त्रीनगर भागातील ३० वर्षीय तरुणाचा १० रोजी अपघाती मृत्यू झाला. मनोज बाविस्कर (भज्ञ्जी) असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेडे रस्त्यावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास त्याची दुचाकी झाडाला धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.