Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
    क्राईम

    १९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskDecember 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    तालुक्यातील खेडीढोक येथील १९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. हितेश विजयसिंग पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  भानुदास पंडित पाटील (४१, खेडीढोक) यांनी याबाबत पारोळा पोलिसात खबर दिली आहे. गावातील महेंद्र मुख्त्यारसिंग पाटील यांनी आपल्याला खबर दिल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. फिर्यादीनुसार, हितेश विजयसिंग पाटील याने त्याच्या खेडीढोक शिवारातील शेतात विष प्राशन केले आहे.

    भानुदास पाटील, महेंद्र पाटील, विशाल पाटील, मंगलसिंग पाटील, शुभम पाटील, गजानन पाटील यांनी हितेश पाटील यास अमळनेर येथे दाखल केले. मात्र त्याची तब्येत खालावल्याने त्याला कुटीर रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार हितेश याला कुटीर रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्याला मयत घोषित करण्यात आले. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेकॉ. कैलास साळुंखे करीत आहेत. काही दिवसांपूर्वी हितेशच्या वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.