जळगाव : प्रतिनिधी
मनपा मालकीच्या गिरणा पंपिंग व बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाइप चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी भाजपकडून मनपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील महाजन यांच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, जितेंद्र मराठे, भगत बालानी, विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, मनोज काळे, गोपाल पोपटानी, सुनील सरोदे, वीरेन खडके, गायत्री राणे, सुरेखा तायडे, आशिष सपकाळे, मुकुंद मेटकर, मुकुंदा सोनवणे, कैलास सोनवणे, राहुल वाघ, राजेंद्र मराठे, शंकर कुमावत, राजेंद्र घुगे पाटील, उमेश देशपांडे, मिलिंद चौधरी, विनोद मराठे, नितीन पाटील, जितेंद्र मराठे, अजित राणे, नितीन पाटील, दीपक पुंडलिक, कैलास सोमाणी, अशोक घाडगे, सदाशिव ढेकळे, धीरज वर्मा, मुविकोराज कोल्हे, भूपेश कुलकर्णी, राजेंद्र मराठे, बापू कुमावत आदी होते. कार्यकर्ते उपस्थित आंदोलनानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.